व्यावसायिक वृद्धीचे व्यासपीठ !

व्यावसायिकांच्या विकासात्मक वाटचालीतील मार्गदर्शक साथीदार…
अन् आपल्या यशातील मूलभूत भागीदार !

आमच्याविषयी अधिक माहिती

२०२३ पासून इस्लामपूरमध्ये व्यवसाय वाढीला चालना

उद्योजक व व्यावसायिकांसाठी आयबीएफ हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे व्यावसायिक एकत्र येतात आणि त्यांच्या कल्पना, जान वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करतात. एकमेकांना विकसित होण्यासाठी मदत करणे या उदात्त हेतूने हे व्यासपीठ कार्यरत आहे. त्यांचे ज्ञान, तंत्र, कौशल्य विकसित करणे तसेच त्यांची देवाण-घेवाण व्हावी, यासाठी हे व्यासपीठ निस्वार्थीपणे काम करते. गेल्या पाच वर्षांत सुमारे पंचवीस कोटींचा व्यवसाय या व्यासपीठाच्या माध्यमातून झाला आहे.

आमचे ध्येय: एक व्यावसायिक समुदाय म्हणून एकत्र वाढणे

व्यवसाय विकास आणि वृद्धीसाठी व्यावसायिकांना एकत्र आणून नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना आणि त्यासंबंधीचे जान विकसित करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आणि निरंतर काळासाठीचा दृष्टीकोन आहे. व्यवसाय वृद्धीसाठी शाश्वत आणि पोषक वातावरण तयार करण्याबरोबरच उद्योजक व्यावसायिकांना आनंदायी व समृद्ध आयुष्याची जाणीव करून देणे.

आर्थिक नियोजन व व्यवस्थापन

व्यवसाय वाढीसाठी शाश्वत आर्थिक नियोजन, खर्च नियंत्रण आणि गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन.

डिजिटल मार्केटिंग व कौशल्य प्रशिक्षण

उद्योजकांना डिजिटल साधनांद्वारे व्यवसाय वाढीसाठी आवश्यक प्रशिक्षण व माहिती देणे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योजना सहकार्य

विविध स्तरांवरील योजनांबाबत माहिती देऊन व्यावसायिक संधी वाढविणे.

ग्रामीण लघुउद्योगांना व्यासपीठ

स्थानीय लघुउद्योजकांना एकत्र आणून व्यवसाय करण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे.

आमची टीम

आमच्या यशाचे आधारस्तंभ

इस्लामपूर बिझनेस फोरमचे नेतृत्व एक समर्पित आणि कुशल टीम करत आहे, जी स्थानिक व्यवसायांना आधार देण्यावर केंद्रित आहे. त्यांच्या एकत्रित अनुभवामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि समुदायाशी दृढ संवाद साधला जातो.

प्रतिक पाटील

संस्थापक

विकास राजमाने

अध्यक्ष

प्रवीण फल्ले

उपाध्यक्ष

नवाज पटवेकर

उपाध्यक्ष

विश्वजीत पवार

सचिव

Our Social Buzz

Highlights from Our Social Media

Catch glimpses of our recent activities, events, and community moments shared on Facebook and Instagram.

Testimonials

What People Are Saying About Us

Here’s what our members and partners have to say about their experience with the Islampur Business Forum.

संपर्क करा

आमच्याशी संपर्कात रहा

आमच्याशी संवाद साधायला आम्हाला आनंद होईल! प्रश्न, कल्पना किंवा सहकार्याच्या संधींसाठी संपर्क करा.

आमचे उपक्रम

सदस्यांसाठी मासिक व्यावसायिक कार्यक्रम

काही प्रश्न आहेत का?

प्रश्नोत्तर

सामान्य प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

इस्लामपूर बिझनेस फोरम म्हणजे काय?

इस्लामपूर बिझनेस फोरम (IBF) हे स्थानिक उद्योजकांसाठी एक व्यासपीठ आहे जे व्यवसाय वाढ, मार्गदर्शन, आणि नेटवर्किंगद्वारे आर्थिक प्रगतीसाठी कार्य करते.

IBF एक्स्पो २०२३ चा उद्देश स्थानिक उत्पादक, सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांना एकत्र आणून व्यवसायवाढीस मदत करणे हा होता.

IBF ताण-तणाव व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, मार्केटिंग, स्टार्टअप गाईडन्स, कृषी प्रकल्प, कर्ज योजना व डिजिटल कौशल्य अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन करते.

नेटवर्किंग, नवउद्योजकांना मार्गदर्शन, नवकल्पनांना प्रोत्साहन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा फायदा IBF सदस्यांना मिळतो.

आमचे सामाजिक अपडेट्स

सोशल मीडियातील महत्त्वाचे क्षण

आमच्याशी फेसबुकवर जोडलं राहा
इस्लामपूर बिझनेस फोरमच्या ताज्या उपक्रमांबाबत अपडेट्स मिळवण्यासाठी फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. आमच्या अलीकडील कार्यक्रमांची, उपक्रमांची आणि सामूहिक क्षणांची झलक फेसबुक व इंस्टाग्रामवर पहा. चर्चेत सामील व्हा, तुमचे विचार शेअर करा आणि बदलाचा भाग व्हा!

औद्योगिक अनुभव यात्रा

प्रेरणादायी उद्योगांना प्रत्यक्ष भेट – अनुभवातून शिकण्याची संधी

इस्लामपूर बिझनेस फोरमच्या सदस्यांनी विविध यशस्वी प्रकल्पांना भेट देत उद्योगविश्वाचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. चितळे डेअरी, मॅप्रो आणि इतर उद्योगांच्या भेटींनी प्रेरणा, शिकवण आणि नवदृष्टी दिली.

चितळे उद्योग समूह

इस्लामपूर बिजनेस फोरमतर्फे पुणे (रानजे) येथील चितळे उद्योग समूहाच्या प्रकल्पास आयबीएफच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील उद्योग व्यवस्थापन, विपणन व विक्री व्यवस्था, कर्मचारी व्यवस्थापन निर्मिती व व्यावसायिक नियोजन या संदर्भातील माहिती घेतली, उद्योजक इंद्रनील चितळे यांनी सर्वांशी संवाद साधत आपले अनुभव सांगितले.

Scroll to Top